अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील केले नगरात महिलेचे बंद घर फोडून चांदीची मुर्ती व रोकड असा एकुण ७ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी ७ जुलै रोजी दुपारी २ वाजता उघडकीला आले. याप्रकरणी रात्री ११.३० वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनुष्का पंकज ठाकरे वय ३० रा. केले नगर. अमळनेर या महिला वास्तव्याला आहे. शनिवार ६ जलै रोजी दुपारी २ वाजता त्यांनी घराला कुलूप लावून बाहेरगावी गेलेल्या होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातून ६ हजारांची रोकड आणि चांदीची देवीची मुर्ती असा एकुण ७ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना रविवारी ७ जुलै रोजी दुपारी २ वाजता उघडकीला आली. घरात चोरी झाल्याबाबत अनुष्का ठाकरे यांनी पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विनोद सोनवणे हे करीत आहे.