जिओ मोबाईल टॉवर मधून बॅटरीची चोरी; धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील साळवा गावात जिओ मोबाईल टॉवर येथून अज्ञात चोरट्यांनी बॅटरीची चोरी केल्याची  घटना समोर आली आहे. याप्रकरणी रविवारी १६ जुलै रोजी रात्री ११ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील साळवा गावात जीओ कंपनीचे टॉवर लावण्यात आले आहे. १३ जुलै रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी ३५ हजार रूपये किंमतीची पॉवर बॅटरीची चोरी केल्याचे उघडकीला आले आहे. दरम्यान ही घटना घडल्यानंतर कंपनीचे प्रतिनिधी प्रविण रामचंद शिंदे (वय-२३) रा. मराठे गल्ली, धरणगाव यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रविवारी १६ जुलै रोजी रात्री ११ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक करीम सैय्यद करीत आहे.

Protected Content