Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

घरासमोरील ईलेक्ट्रीक मोटारीची चोरी; सावखेडा गावातील घटना

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील सावखेडा गावातून ११ हजार रुपये किमतीची पाण्याची इलेक्ट्रिक मोटर चोरून येण्याची घटना बुधवारी १९ जून रोजी सकाळी ६ वाजता समोर आली आहे. याबाबत गुरुवारी २० जून रोजी रात्री १० वाजता जळगाव तालुका पोलिसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक अशी की, समाधान विश्राम सोनवणे वय 44 रा. सावखेडा ता. जळगाव ते आपल्या कुटुंबासह वास्तव्याला असून शेती काम करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरासमोर ठेवलेली ११ हजार रुपये किमतीची इलेक्ट्रिक पाण्याची मोटार चोरून येण्याची घटना बुधवारी १९ जून रोजी सकाळी ६ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी समाधान सोनवणे यांनी गुरुवारी २० जून रोजी रात्री १० वाजता जळगाव तालुका पोलिसात ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल मोरे करीत आहे.

Exit mobile version