जळगाव प्रतिनिधी । मेहरूण परिसरातील गणेशपुरी भागातून घरासमोर लावलेली रिक्षा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, अकील शहा मुसा शहा (वय-४०) रा. गणेशपुरी मेहरूण हे आपल्या कुटुंबियासह राहतात. रिक्षा चालवून उदरनिर्वाह करतात. १६ मे रोजी दिवसभर काम करून त्यांनी रिक्षा (क्रमांक एमएच १९ बीजे २०८१) घरासमोर पार्किंगला लावली होती. १७ मे रोजी मध्यरात्री २ ते सकाळी ७ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी रिक्षा चोरी केल्याचे उघडकीला आले आहे. परिसरात रिक्षाचा शोध घेतला असता मिळून आली नाही. अकील शहा यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप पाटील करीत आहे.