दारूच्या नशेत महिलेसह परिवाराला मारहाण; सहा जणांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । जुन्या भांडणाच्या कारणावरून दारूच्या नशेत एका महिलेला शिवीगाळ करून घरातील सदस्यांना मारहाण केल्याची घटना कानळदा रोडवरील शिवशंकर कॉलनीत घडली. शहर पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, जुन्या भांडणाच्या कारणावरून दिपक दगडू भोई रा. शिवशंकर कॉलनी याने दारूच्या नशेत पुजा रविंद्र सोनवणे या महिलेला अश्लिल शिवीगाळ केली. ही घटना १७ मे रोजी दुपारी १ वाजता घडली. महिलेच्या परिवाराला देखील दिपक भोईचा मोठा भाऊ युवराज, युवराजची पत्नी, भाचा, दिपकची आई आणि युवराजचा मुलगा असे सहा जणांनी शिवीगाळ करून रॉड, बॅट, बांबू आणि दगडाने मारहाण केली. यात पुजा सोनवणे यांच्या डोक्याला जबर जखम झाली आहे. जखमीस खासगी रूग्णालयात दाखल केले आहे. तपासाअंती पुजा सोनवणे यांच्या फिर्यादी शहर पोलीस ठाण्यात सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रविंद्र पाटील करीत आहे.

Protected Content