मुक्ताईनगर प्रतिनिधी । वाहन मालकाच्या घरासमोरून चारचाकी वाहन चोरून नेल्याची घटना मुक्ताईनगरात उघडकीला आली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, शेख आरीफ शेख हमीद रा. घोडपी, मदीना नगर मुक्ताईनगर हे चारचाकी मालवाहू वाहनावर चालक आहे. २० एप्रिल २०२१ रात्री ११ ते १२ एप्रिल २०२१ रोजीच्या दरम्यान त्यांनी त्यांच्या मालकीची बोलेरो पिकअप वाहन (एमएच ४६ एएफ ७४५) वाहन घरासमोर पार्किंगला लावली होती. मध्यरात्री संशयित आसीफ मोहंमद मिरशेख रा. पहूर ता. जामनेर, आसीफ नूर मोहंमद बागवान रा. सिडफार्म मुक्ताईनगर जि.जळगाव आणि एक अनोळखी व्यक्ती या तिघांनी घरासमोर लावलेली वाहन चोरून नेल्याचे बुधवारी सकाळी उघडकीला आले. शेख आरीफ यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तिघांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक श्रावण जवरे करीत आहे.