मुक्ताईनगर उपजिल्हा रूग्णालयाला रोहिणी खडसे यांच्याकडून ८ ऑक्सीजन सिलेंडर उपलब्ध

मुक्ताईनगर प्रतिनिधी । कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर उपजिल्हा रूग्णालयातील कोवीड रूग्णालयात जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी ८ ऑक्सीजन सिलेंडर उपलब्ध करून दिले आहे. द्यकीय अधिक्षक डॉ.योगेश राणे यांच्याकडे हे ऑक्सिजन सिलेंडर सुपुर्द करण्यात आले. 

मुक्ताईनगर तालुक्यात सुद्धा रुग्ण संख्या वाढतीच असुन उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर येथे असणारे कोविड केअर सेंटर पुर्ण रुग्ण क्षमतेने भरलेले असते. यात काही रुग्ण अत्यवस्थ होत असुन त्यांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची गरज भासते यातच काही वेळा ऑक्सिजनचा पुरवठा अपुर्ण पडतो अशा वेळी अत्यावस्थ रुग्णांना जळगाव व इतरत्र हलविण्यासाठी प्रशासनाला धावपळ करावी लागते. यासाठी रुग्णालय प्रशासनाकडे अधिकचे ऑक्सिजन सिलेंडर जवळ असणे गरजेचे आहे म्हणजे कोणतीही अनुचित घटना घडणार नाही. यासाठी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे – खेवलकर यांनी त्या उपाध्यक्ष असलेल्या संत मुक्ताई शुगर एन्ड एनर्जी आणि त्या अध्यक्ष असलेल्या कै ग सु वराडे औद्योगिक प्रशिक्षण संस्था या संस्थांच्या माध्यमातून उपजिल्हा रुग्णालयास कोविड संक्रमण काळासाठी आठ ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून दिले. 

 

रोहिणी ताई खडसे खेवलकर यांच्या हस्ते नायब तहसिलदार पानपाटील आणि उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.योगेश राणे यांच्याकडे हे ऑक्सिजन सिलेंडर सुपुर्द करण्यात आले. यावेळी बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, माजी पं. स. सभापती राजेंद्र माळी, माजी सरपंच प्रविण पाटील,प्रदिप साळुंखे, नगरसेवक आसिफ बागवान, बापु ससाणे, कोथळी पोलीस पाटील, संजय चौधरी, कल्याण पाटील, संजय कोळी, शिवराज पाटील,  राजु कापसे, मुक्ताई अँबुलन्सचे योगेश पाटील, चेतन राजपुत, अक्षय पालवे उपस्थित होते.

Protected Content