Home क्राईम नशिराबाद येथून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

नशिराबाद येथून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

0
137

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अधिक माहिती अशी की, नशिराबाद येथे १६ वर्षीय मुलगी आपल्या मामासह नातेवाईकांसह राहते. ९ मे रोजी रात्री घरात सर्वजण झालेले असतांना मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीला फूस व आमिष दाखवत पळवून नेले. हा प्रकार १० मे रोजी सकाळी ४.३० वाजता मामाच्या लक्षात आला. परिसरासह नातेवाईक आणि मैत्रिणीकडे शोध केला असता भाची आढळून आली नाही. मंगळवारी रात्री उशीरापर्यंत घरी न आल्याने अल्पवयीन मुलीच्या मामाने नशिराबाद पोलीसात धाव घेतली. मामाच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मोहन चौधरी करीत आहे.


Protected Content

Play sound