पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील कुऱ्हाड येथील प्रगतीशील शेतकरी डॉ. प्रदिप महाजन यांचा शेतातील १० शेळ्या चोरीला गेल्याची घटना घडली आहे.
डॉ. प्रदिप महाजन रस्त्यावर कुऱ्हाड गावाजवळ गुरांचा गोठा असून या गोठ्यात ते शेती उपयोगी साहित्य, शेतीमाल ठेवत असत तसेच गायी, म्हशी, बैलजोडी व शेळ्या बांधत होते. याच गोठ्यातुन दि. ६ च्या रात्री ते गुरुवार सकाळपर्यंत गोठ्यात कुणीही नसल्याचा फायदा घेत या गोठ्यातील अंदाजे एक ते दिड लाख रुपये किंमतीच्या दहा शेळ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे.