पहूर, ता जामनेर प्रतिनिधी । येथील प्रकाश नगर मध्ये चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून पस्तीस हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत जोशी हे पेठ गावातून प्रकाश नगरातील त्यांच्या घरात राहण्यासाठी येणार होते. यासाठी घरात सामान टाकण्यात आला होता. दरम्यान, घर बंद असल्याचा फायदा चोरट्यांनी घेऊन रात्री घराचे कुलूप तोडून घरातील कपाट फोडले.यातून आठ ग्रँम सोन्याची साखळी, पाच ग्रँम आंगठी,दोन ग्रँम गव्हळी मणी, व चांदीचे दागिने यासोबत चोवीसशे रूपये रोख असा पस्तीस हजार चारशेचा ऐवज घेऊन पोबोरा केला आहे.
याची माहिती मिळताच घटनास्थळी साहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाट, पोउनि अमोल देवडे, साहाय्यक फौजदार अनिल अहिरे,ईश्वर देशमुख यांनी पाहणी करून पंचनामा केला. या प्रकरणी अनिरुद्ध अनंत जोशी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असाच प्रकार त्याच रात्री साईनगर मधील धनराज चौधरी व प्रकाश नगरातील प्रकाश पंढरीनाथ पाटील यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.