बोदवड शहरातील दोन दुकानांमध्ये चोरी

बोदवड प्रतिनिधी । येथे एकाच रात्री दोन दुकानांमध्ये चोरीच्या घटना घडल्या असून या प्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोदवड शहरातील धान्य दुकान व मोबाईल शॉपी अज्ञात चोरट्यांनी फोडले दोन्ही दुकानदाराकडून पोलीस स्थानकात अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात फिर्यादी हर्षल विजय अग्रवाल वय २० व्यवसाय मोबाईल शॉपी यांच्या फिर्यादीवरून दिनांक ६ रोजी रात्री आठ वाजेपासून ते ७ रोजी सकाळी ८ वा दरम्यान गौरीशंकर कॉम्प्लेक्समधील मयूर मोबाईल शॉपी येथे चोरी झाली त्यात सात हजार ८०० रुपये किमतीचे ६ मोबाईल व सात हजार रुपये किमतीचे ओराईमो कंपनी चे हेडफोन तीन नग , चार हजार रुपये किमतीचे ओराईमो कंपनी चे घड्याळ १००० रुपये १००० रुपये रोख व पाच हजार रुपये किमतीचे आठ नग पेन ड्राईव्ह असे एकूण २४ हजार ८०० रुपये किमतीची वस्तू अज्ञात चोरट्यांनी चोरी करून पोबारा केल्याचे नमूद करण्यात आले आहे.

यासोबत दुसरे फिर्यादी राजमल खुबचंद अग्रवाल यांच्या फिर्यादीवरून धान्य दुकानातून याच कालावधीत अज्ञात चोरट्यांनी धान्य दुकानातील दोन हजार रुपये किमतीचे चिल्लर नाणी व दोन हजार रुपये किमतीचा सॅमसंग मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. यावरून बोदवड पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉस्टेबल कालीचरण बिर्‍हाडे करीत आहेत.

कर्तव्यदक्ष निरिक्षकांची आवश्यकता

दरम्यान, बोदवड शहरासह तालुक्यात वाढती गुन्हेगारी पाहता व तसेच बोदवड शहरामध्ये चोरीच्या वाढत्या घटना पाहता बोडवडकरांना कर्तव्यकठोर निरिक्षक हवे अशी मागणी करण्यात येत आहे. तत्कालीन इंस्पेक्टर सी. डी. बनगर यांच्या कारकिर्दी नंतर बोदवड शहरासह तालुक्यात गुन्हगारी व चोरीचे सत्र सुरूच राहिले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मनस्ताप निर्माण झाला आहे. बनगर यांच्या प्रमाणे निरिक्षकाची मागणी आता नागरिकांकडून करण्यात येत आहे. लोकप्रतिनिधींनीही या लोकभावनेचा विचार करावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Protected Content