पिंप्राळ्यातील वटुकेश्वर महादेव मंदिरात चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पिंप्राळा येथील कोळीवाडा जवळील वटुकेश्वर महादेव मंदिरातील नागदेवता व त्रिशूल चोरी झाल्याची घटना दि.6 रोजी सकाळी 10.30 वाजता घडली.याबाबत रामानंद नगर पोलीसात लेखीनोंद करण्यात आली आहे. मंदिरात चोर आहे कि भाविक हे लक्षात येत नसल्याने चोरांने यांचा फायदा घेत सकाळीच मंदिरातील पाच किलोचा पितळी नागदेवता व दोन किलोचा पितळी त्रिशुल चोरून नेला.

याबाबत परीसरातील ग्रामस्थांनी रामानंद नगर पोलीसात लेखी सह्यासहीत तक्रार केली आहे.यावेळी रामानंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. गेल्या महिन्या भरापासून‌ सोनी नगर जवळील श्रीराम नगरातील हनुमान मंदिरातील हनुमान मुर्तीला चांदीचे दोन डोळे लावले होते ते चोरी झाल्याची घटना घडली होती. तसेच सोनी नगरातील अनेकांच्या लहान सायकली चोरी झाल्या असून रात्रीच्या वेळी भुरटे चोरांची मुजोरी वाढल्यामुळे सोनी नगर, पिंप्राळा परीसरात पोलीसांनी रात्रीच्या वेळी गस्त घालण्यात यावी अशी मागणी परीसरातील नागरीकांनी केली आहे.

Protected Content