Home Cities भुसावळ साकेगाव येथील अंगणवाडीत चोरी

साकेगाव येथील अंगणवाडीत चोरी


साकेगाव, ता. भुसावळ प्रतिनिधी | येथील स्मार्ट अंगणवाडीत चोरी झाल्याचे आज सकाळी उघडकीस आले आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, येथील ग्रामपंचायतीतर्फे स्मार्ट अंगणवाडी सुरू करण्यात आली आहे. आज सकाळी स्वयंसेविका आल्या असता त्यांना येथील सामानाची उलथापालथ झाल्याचे दिसून आले. त्यांनी आत जाऊन पाहिले असता अंगणवाडीतील सामान चोरीला गेल्याचे त्यांना दिसून आले. मध्यवर्ती ठिकाणी असणार्‍या अंगणवाडीत चोरी झाल्यामुळे गावात खळबळ उडाली आहे.

या संदर्भात शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता.


Protected Content

Play sound