जळगाव प्रतिनिधी । शहरातील विठ्ठल पेठ भागातून खासगी नोकरी करणाऱ्या तरूणाची ३२ हजार रूपये किंमतीचा दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, चंद्रकांत लिलाधर झोपे (वय-२९) रा. विठ्ठल पेठ, जुने जळगाव हा तरूण खासगी नोकरी करतो. कामावर जाण्यासाठी त्याच्याकडे (एमएच १९ बीएन ९४) क्रमांकाची दुचाकी आहे. २५ एप्रिल रोजी रात्री १२.३० ते सकाळी ६ वाजेच्या दरम्यान घरसमोर लावलेली ३२ हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार सकाळी उघडकीला आल्याने परिसरात शोधाशोध केली परंतू दुचाकी आढळून आली नाही. चंद्रकांत झोपे यांच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अमित बाविस्कर करीत आहे.