जळगाव प्रतिनिधी । शहरातील गोलाणी मार्केट परिसरातील पार्किंगमधून तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, धनंजय भरत निकम (वय-२१) रा. प्रिया ट्रेडिंग कंपनी, जुना मेहरूण रोड जळगाव हा तरूण २ जून रोजी दुपारी १२ वाजता दुचाकी (एमएच १९ बीके ३९१५) ने शहरातील गोलाणी मार्केट परिसरात आला. त्यावेळी दुचाकी तळमजल्यावरील गायत्री फुल भंडार येथे पार्किंगला लावली. १२.१५ वाजेच्या सुमारास काम आटोपून घरी जाण्यासाठी निघाला असता दुचाकी जागेवर दिसून आली नाही. परिसरात शोधाशोध केली परंतू कुठेही दुचाकी आढळली नाही. धनंजय निकम यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक भास्कर ठाकरे करीत आहे.