जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील नवीन बसस्थानकाजवळील हॉटेल सुयोग समोरून तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हापेठ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुषण सुनिल राऊत (वय-२६) रा. पिंप्राळा चिंचपूरा जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला असून रिपेंअरींगचे कामे करून उदरनिर्वाह करतो. २४ जून रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास भुषण हा त्याची दुचाकी (एमएच १९ सीबी ९०५९) ने नवीन बसस्थानक जवळील हॉटेल सुयोग जवळ आला. हॉटेल समोरच त्यांने दुचाकी पार्क करून लावली होती. काम आटोपून दुपारी ४ वाजता दुचाकीजवळ आला असता त्याला त्याची दुचाकी जागेवर आढळून आली नाही. त्याने परिसरात दुचाकीचा शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही आढळून आली नाही. तीन दिवसानंतर सोमवारी २७ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्याच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक जुबेर तडवी करीत आहे.