धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पष्ठाणे गावात काहीही कारण नसतांना तरूणाला बेदम मारहाण मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना २ नोव्हेंबर रोजी रात्री सोडनऊ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी शनिवारी ११ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रितेश राजेंद्र पाटील वय-२७ रा. पष्ठाणे ता.धरणगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. २ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरून रितेश पाटील याला गावात राहणारे अनिताबाई दिलीप सोनवणे, अजय सुरेश सोनवणे, उषाबाई सुरेश सोनवणे, दिपाली अजय सोनवणे सर्व रा. पष्टाणे ता.धरणगाव यांनी लाठ्याठ्यांनी बेदम मारहाण करून दुखापत केली. उपचार घेतल्यानंतर रितेश पाटील याने धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शनिवारी ११ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजता अनिताबाई दिलीप सोनवणे, अजय सुरेश सोनवणे, उषाबाई सुरेश सोनवणे, दिपाली अजय सोनवणे सर्व रा. पष्टाणे ता.धरणगाव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ ईश्वर शिंदे करीत आहे.