Home क्राईम विजेच्या धक्क्याने तरुणाचा जागीच मृत्यू

विजेच्या धक्क्याने तरुणाचा जागीच मृत्यू

0
31
161097 shock
161097 shock

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विजेच्या धक्क्याने ३४ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शेवगा पिंप्री येथे घडली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गोपाल मदन राठोड (वय-३४) रा. शेवगा पिंप्री ता. जामनेर हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. बुधवार १ जून रोजी दुपारी विजेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नातेवाईकांनी तातडीने जामनेर येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार जयसिंग राठोड करीत आहे.

 

 


Protected Content

Play sound