धरणगाव, प्रतिनिधी | गुरे चारण्यासाठी गेलेला एक तरुण गिरणा नदीत अचानकपणे आलेल्या पुरामुळे बुडून मरण पावल्याची घटना आज (दि.२५) दुपारी घडली.
अधिक महिती अशी की, मुकेश कपुरचंद पवार (वय २७) हा तालुक्यातील बाभुळगाव येथील रहिवासी असलेला तरुण आज सकाळी नेहमीप्रमाणे गुरे चरण्यासाठी नदीतून गेला त्या वेळेस नदीत पाणी कमी होते, मात्र संध्याकाळी ४.०० च्या सुमारास घरी परत येताना अचानक गिरणा नदीत पाण्याची पातळी वाढलेली होती. त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. तापी नदीतून पाण्याचा उलटा प्रवाह गिरणा नदीत आल्यामुळे अचानकपणे पाण्याची पातळी वाढल्याचे समजते.