शेतातून तरुणाचा मोबाईल लांबविला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील रेल्वेस्थानकाच्या बाजूला असलेल्या शेतातून तरुणाचा मोबाईल लांबविल्याची घटना समोर आली आहे, याप्रकरणी शनिवारी  एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जळगाव तालुक्यातील शिरसोली गावातील देवानंद अमरसिंग पावरा वय २३ हा तरुण शेती करतो, शिरसोली रेल्वेस्थानकाला बाजूला त्याची शेती आहे, ४ ऑगस्ट रोजी या शेतात देवानंद हा नेहमीप्रमाणे गेला होता, काम करत असतांना त्याने मोबाईल शेतात एका बाजूला ठेवलेला होता. काम आटोपून झाल्यावर रात्री १२ वाजता त्याला त्याचा मोबाईल आढळून आला नाही. सर्वत्र शोध घेवूनही मिळून न आल्याने मोबाईल चोरीची देवानंद याची खात्री झाली, त्यानंतर त्याने आठ दिवसांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली, या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन मुंडे हे करीत आहेत.

Protected Content