हॉटेल समोरून तरुणाची दुचाकी लांबविली

नशिराबाद लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | नशिराबाद गावाजवळील अमृत हॉटेल जवळून एका तरुणाची दुचाकी चोरून नेल्याची घटना ६ जून रोजी दुपारी १ वाजता समोर आले आहे. याबाबत बुधवार १२ जून रोजी रात्री १० वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, प्रणव जितेंद्र पाटील वय-२६ रा. नशिराबाद तालुका जळगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून तो आपला उदरनिर्वाह करतो. दरम्यान ६ जून रोजी दुपारी १ वाजता त्याची दुचाकी ही गावातील अमृत हॉटेल समोर लावलेले होती. ही दुचाकी अज्ञात चोरून नेली. दुचाकी चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रणव पाटील याने दुचाकीचा शोध घेतला परंतु काहीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्यांने अखेर बुधवारी १२ जून रोजी रात्री १० वाजता नशीराबाद पोलिसात धाव घेऊन तक्रार केली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र ठाकरे करीत आहे.

Protected Content