घरासमोरून तरूणाची दुचाकी लांबविली

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील शहा आलम नगरातून तरुणाची ३५ हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना समोर आली आहे. याबाबत सोमवारी २ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता अज्ञात चोरट्यावर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, इमरान खान हबीब खान पठाण (वय-३०) रा. शहा आलम नगर, अमळनेर हा तरुण आपला परिवारासह वास्तव्याला आहे. हातमजुरी करून आपला उतरनिर्वाह करतो. कामावर जाण्यासाठी त्याच्याकडे (एमएच १९ डीएच ६१५८) क्रमांकाची दुचाकी आहे. या दुचाकीवरून तो कामावर जेजा करत असतो. १ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता त्याने त्याची दुचाकी त्याच्या घरासमोर पार्किंगला लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ३५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेल्याचे सोमवारी २ जानेवारी रोजी पहाटे ५ वाजता समोर आली. त्याने दुचाकीच्या सर्वत्र शोध घेतला, परंतु दुचाकी मिळून न आल्याने अखेर दुपारी २ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रमोद पाटील करीत आहे.

 

Protected Content