तरूणाची दुचाकी लांबविली; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0
13

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोलाणी मार्केटजवळील अग्नीशमन कार्यालयासमोरून तरूणाची ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याबाबत मंगळवार २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजय प्रदीप चांदेलकर (वय-२७) रा.शिवाजी नगर, जळगाव हा तरूण खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. सोमवारी २६ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता अजय हा त्याची दुचाकी (एकएच १९ सीएम ५८८९) ने गोलाणी मार्केटमधील अग्नीशमन विभागाच्या कार्यालयाजवळ आला होता. दुचाकी कार्यालयासमोरील पार्किंगच्या जागेवर लावली होती. अज्ञात चोरट्याने ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास समोर आले. अजयने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर मंगळवारी २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक राजकुमार चव्हाण करीत आहे..