हातमजूराची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीतून हातमजुराची दुचाकी लांबविल्याप्रकरणी मंगळवार २७ सप्टेंबर रोजी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव शहरातील मेस्को माता नगरात लहू जीवराम अडकमोल हे वास्तव्यास आहेत. ते कामानिमित्ताने २६ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात गेले होते, यादरम्यान त्यांनी त्यांची (एमएच १९ बीआर ११४८) या क्रमांकाची दुचाकी कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात उभी केली होती. काम आटोपून तासाभरात परतले असता दुचाकी आढळून आली नाही, अखेर सर्वत्र शोध घेवूनही दुचाकी मिळून न आल्याने अखेर लहू अडकमोल यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील हे करीत आहेत.

Protected Content