तरूणाची दुचाकी लांबविली; बाजारपेठ पोलीसात गुन्हा दाखल

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील दिनदयाल नगरातील मस्जिद जवळून तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सोमवारी २ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास समोर आली आहे.  याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात रात्री ९ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रफिक शेख शब्बीर शेख (वय-३९) रा. नूरानी मज्जिद जवळ, दीनदयाल नगर, भुसावळ हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खाजगी वाहन चालवून आपला उदरनिर्वाह करतो. रविवारी १ ऑक्टोबर रोजी त्याने त्याच्या घरासमोर त्याची मालकीची दुचाकी (एमएच १९ डीटी ३३११) ही पार्किंगला लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी हे दुचाकी चोरून नेली. हा प्रकार सोमवारी २ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास समोर आला. दुचाकी चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर रफिक शेख यांनी त्यांच्या दुचाकीचा परिसरात शोध घेतला, परंतु दुचाकी कुठेही मिळाली नाही. अखेर रात्री ९ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल महेश चौधरी करीत आहे.

Protected Content