Home क्राईम लग्न लावून देण्याचे आमिष दाखवत तरूणाला गंडविले; दोन जणांवर गुन्हा दाखल

लग्न लावून देण्याचे आमिष दाखवत तरूणाला गंडविले; दोन जणांवर गुन्हा दाखल


चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्याती डामरूण येथील तरूणाचे लग्न लावून देण्याचे सांगून दोन जणांनी २ लाख रूपये रोख व सोन्याचे दागिने घेवून पसार झाल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील डामरूण येथील २८ वर्षीय तरूण शेती करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतो. दरम्यान औरंगाबाद येथील आशा संतोष शिंदे आणि किरण भास्कर पाटील उर्फ बापू पाटील रा. आमडदे ता. भडगाव यांनी तरूणाचे लग्न लावून देतो असे सांगून तरूणाकडून २ लाख रूपये रोख व ४० हजार रूपयांचे दागिने २० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान घेवून पसार झाले. याप्रकरणी तरूणाच्या फिर्यादीवरून चाळीसगाव पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound