तक्रार केल्याच्या रागातून तरूणाला केली मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील बजरंग बोगद्याजवळ पोलीसात तक्रारी अर्ज केल्याच्या कारणावरून तरूणाला लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, भूषण पंडीत रांझण वय २१ रा. राजमालती नगर, दुधफेडरेशन, जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. त्याच परिसरात राहणारा शेख जुबेर शेख उमर याच्या मामाच्या विरोधात भूषण रांझण यांने पोलीसात जुन्या वादातून तक्रार केली होती. या रागातून शेख जुबेर शेख उमर याने गुरूवारी १८ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजता शहरातील बजरंग बोगद्याजवळ भूषणचा रस्ता आडवून त्याला लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. यात भूषणचा हात फ्रॅक्चर झाला आहे. याप्रकरणी शुक्रवारी १९ एप्रिल रोजी रात्री १० वाजता भूषण रांझण याने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याने दिलेल्या तक्रारीवरून मारहाण करणाऱ्या शेख जुबेर शेख उमर रा. राजमालती नगर, जळगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक राजेश पदमर हे करीत आहे.

Protected Content