जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील भाऊंचे उद्यानाजवळ एका तरुणाला विनाकारण मारहाण करून त्याच्या खिशातील रोकड जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना रविवारी २३ फेब्रुवारी रोजी दुपारी १.३० वाजता घडली. याप्रकरणी रात्री १० वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा तपशील:
सुभाष रामराव घुगे (वय-३४, रा. अकोला, ह.मु. आयोध्या नगर, जळगाव) हे कामाच्या निमित्ताने जळगावात राहतात. रविवारी दुपारी ते भाऊंचे उद्यानाजवळ आले असता, एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली. नंतर त्याने सुभाष घुगे यांना मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांच्या खिशातील रोकड हिसकावून पसार झाला.
पोलिसांकडून तपास सुरू
घटनेनंतर सुभाष घुगे यांनी तातडीने रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार रात्री १० वाजता अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे करीत आहेत.