जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील ॲक्सॉन ब्रेन हॉस्पिटलजवळील रोडवर पायी जात असलेल्या तरूणाला दुचाकीवर आलेल्या दोन पुरूष आणि एक महिला अशा तिघांनी बेदम मारहाण करून जवळील ८ हजार रूपये किंमतीच मोबाईल जबरी हिसकावून लांबविल्याची घटना रविवारी रात्री घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, अक्षय विलास शेलार वय २८ रा. निमखेडीरोड, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. वाहन चालवून तो आपला उदरनिर्वाह करतो. रविवार १० मार्च रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास शहरातील ॲक्सॉन ब्रेन हॉस्पिटल येथे कामानिमित्त आलेला होता. तो पायी जात असतांना मागून दुचाकीवर आलेले अज्ञात दोन पुरूष आणि १ महिला अश्या तिघांनी अक्षय शेलार याला पकडून मारहाण केली. तसेच त्याच्या जवळील ८ हजार रूपये किंमतीचा मोबाईल जबरी हिसकावून चोरून नेला. याप्रकरणी सोमवारी ११ मार्च रोजी रात्री ८ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात तीन जणंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उल्हास चऱ्हाटे हे करीत आहे.



