जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील विठ्ठल पेठ येथे राहणाऱ्या एका २५ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी २० मे रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी सकाळी १० वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हर्षल नंदकिशोर सोनार वय-२५ रा. विठ्ठल पेठ, जुने जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील विठ्ठल पेठ भागात हर्षल सोनार हा तरूण आपल्या आई मंदाबाई यांच्या सोबत वास्तव्याला होता. जळगाव शहरातील जयदुर्गा वखार येथे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. हर्षलने मध्यरात्री राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. ही घटना सोमवारी २० मे रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आली. मुलाने गळफास घेतल्याचे पाहून आईने हंबरडा फोडला. शेजारी राहणाऱ्या नागरीकांनी धाव घेवून खाली उतरवून तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई मंदाबाई आणि एक विवाहित बहिण असा परिवार आहे.