यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील पिंपरूड गावातील एका अविवाहित तरूणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी सकाळी उघडकीला आले आहे. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिनेश शांताराम सरवाडे वय-२५, रा. डॉ.आंबेडकर नगर, पिंपरूड ता. यावल असे मयत तरूणाचे नाव आहे.
याबाबत अधिक असे की, दिनेश शांताराम सरवाडे वय-२५, रा. डॉ.आंबेडकर नगर, पिंपरूड ता. यावल या अविवाहीत तरुण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. मजूरीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करतो. गुरूवारी २ मे रोजी सकाळी ८ वाजेच्या पुर्वी आपल्या राहत्या घरातील छताच्या ऍगलला नायलॉनच्या दोरीने गळफास घेत आत्महत्या करीत आपली जिवनयात्रा संपवली आहे. या बाबत मयत दिनेश सुरवाडेचा लहान भाऊ चेतन शांताराम सुरवाडे वय२० वर्ष यांनी खबर दिल्याने फैजपुर पोलीस ठाण्यात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान या तरूणाने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही. मयत दिनेश सुरवाडे याच्या मृतदेहाचे यावलच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास फैजपुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार रशीद तडवी हे करीत आहे .