तरूणाने बंद खोलीत घेतला टोकाचा निर्णय…

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील सुप्रीम कॉलनीमध्ये राहणाऱ्या राजन प्रसाद मौर्य (वय ३२, रा. सुप्रीम कॉलनी परिसर, जळगाव ) या तरूणाने छताला गाळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवार ३ जून रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राजन प्रसाद मौर्य हा तरूण पूर्वी जळगावातील विविध कंपन्यांमध्ये काम करीत होता. सध्या महिन्याभरापासून त्याच्याकडे कुठलेच काम नव्हते. खोलीत तो एकटाच राहत होता. त्याच्या गावाकडे वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. सोमवारी ३ जून रोजी मध्यरात्री १ वाजेनंतर कधीतरी त्याने त्याच्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. सकाळी ८ वाजता त्याच्या सोबतच्या कामगारांना तो बाहेर दिसून आला नाही, तेव्हा त्याच्या खोलीवर गेले असता तो दरवाजा उघडत नव्हता. या वेळेला नागरिकांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा तोडून पाहिले तर रंजन प्रसाद मौर्य हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. त्यानंतर त्याचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल पाटील यांनी त्यास तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

Protected Content