बोदवडातून अल्पवयीन मुलीला पळविले; पोलीसात गुन्हा

बोदवड प्रतिनिधी । शहरातील १४ वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील एका भागात १४ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियांसह राहते. दरम्यान १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता अल्पवयीन मुलगी घरी एकटी असतांना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी मुलीची परिसरात शोधाशोध केली परंतू आढळून आली नाही. याप्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी बोदवड पोलीसात धाव घेतली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात बोदवड पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार सुधाकर शेजोळे करीत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!