सेवानिवृत्त शिक्षकांची हरवलेली मौल्यवान कागदपत्र व पैसे असलेली पिशवी तरूणाने केली परत

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील पटेल समाजातील तरुणाने जातीपातीच्या पलीकडे जावुन माणुसकीचे दर्शन घडवित वयोवृद्ध व्यक्तिची मिळालेली महत्वाच्या मोल्यवान कागदपत्रांची व त्यातील काही पैसे असलेली पिशवी त्यांना सापडली व त्यांनी संबंधीत व्यक्तिस तात्काळ बोलवुन त्यांच्या स्वाधीन केली.

या संदर्भातील वृत्त असे की, पंडीत चिमण नेमाडे (वय ७४ वर्ष रा. सावदा ता. रावेर) व दहीगाव येथे शिक्षक म्हणून सेवा बजावलेले सेवानिवृत्त शिक्षक हे आज दिनांक २८ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मोटरसायकलने फैजपुरकडून यावलकडे काही कामा निमित्ताने येत असतांना मोटरसायकल वरून येत असतांना त्यांच्या ताब्यातील ८ हजार रूपये रोकड व महत्वाची मोल्यवान कागदपत्र असलेली पिशवी मोटरसायकल वरून खाली पडली तेव्हा ही पिशवी यावल येथील मतीन सिकंदर पटेल (वय २२ वर्ष) या तरुणास सापडली.

दरम्यान मतीन पटेल या तरूणाने त्या कापडी पिशवी उघडून पाहिली असता त्यातील कागदपत्रावरील असलेल्या मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधुन तुमची हरवलेली पिशवी आमच्याकडे असल्याचे सांगुन यावल आल्यावर आपली पिशवी घेवुन जा असे मतीन पटेल यांनी सांगीतले व दिलेल्या माहिती वर यावल येथे आल्यावर त्या वयोवृद्ध पंडित नेमाडे यांच्याकडे त्यांची पिशवी सोपवली त्यांनी पिशवीतील ८ हजार रूपये आणी महत्वाच्या कागदपत्रांची पाहणी केली व व्यवस्थित असल्याचे सांगीतले या वेळी या तरूणाची माणुसकी पाहून नेमाडे यांनी पटेल यास एक हजार रूपयांचे बक्षीस दिले .यावेळी आनंदाने भारावलेले पंडित नेमाडे यांनी आपल्या सारख्या ईमानदार तरुणांमुळे माणुसकी अजुन जिवंत असल्याचे म्हटले .

Protected Content