नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतीय रेल्वे गेल्या दहा वर्षांतील सर्वांत वाईट स्थितीला सामोरी जात असल्याची चिंता वाढवणारी माहिती महालेखा परिक्षकांच्या (कॅग) अहवालातून समोर आली आहे.
कॅगच्या अहवालानुसार, भारतीय रेल्वेची गेल्या दहा वर्षातील कमाई सर्वात खालच्या स्तरावर पोहोचली आहे. आजच्या घडीला रेल्वे आपल्या सर्व सेवा-सुविधांमधून रेल्वे २ टक्के पैसे देखील कमावू शकत नाहीय. रेल्वेचा २०१७-१८ या आर्थिक वर्षात ऑपरेटिंग रेशिओ ९८.४४ टक्क्य्यांवर पोहोचला आहे. थोडक्यात रेल्वे ९८ रुपये ४४ पैसे खर्च करीत केवळ १०० रुपयांची कमाई करीत आहे. म्हणजेच रेल्वेला केवळ एक रुपया ५६ पैशांचा फायदा होत आहे. व्यावसायिकदृष्ट्या ही सर्वात वाईट स्थिती मानली जात आहे.