१ जूनपासून देशभरात ‘एक देश, एक रेशनकार्ड’ लागू – पासवान

ram vilas pasavan

नवी दिल्ली प्रतिनिधी । केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान म्हणाले की, पुढच्या वर्षी १ जूनपासून ‘एक देश, एक राशन कार्ड’ योजना देशभरात लागू होईल. पासवान यांनी मंगळवारी लोकसभेत प्रश्नोत्तरादरम्यान, ही माहिती दिली. ते म्हणाले की, सध्या राशन कार्डसाठी 14 राज्यांमध्ये पीओएस मशीनची सुविधा सुरू करण्यात आली आहे. लवकरच याला देशातील सर्व राज्यात लागू केले जाईल.

या मोहिमेचा कामगार, व दुर्बल घटकातील लोकांना फायदा होणार आहे. या कार्ड अंतर्गत देशातील कोणत्याही भागातून रेशन दुकानातून खाद्य सामान घेता येऊ शकणार आहे. ही सुविधा ई-पीओएस मशीनवर बायोमॅट्रिक आधारवर अवलंबून आहे. ही मोहीम संपूर्ण देशभरात एक जूनपासून सुरू होणार आहे. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी मंगळवारी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. सध्या रेशन कार्डसाठी १४ राज्यात पॉश मशीनची सुविधा सुरू करण्यात आली आहे. तसेच लवकरच २० राज्यात आणि केंद्र शासीत प्रदेशात ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. पुढील एक जूनपासून एक राष्ट्र, एक रेशन कार्ड सुरू करण्याचे सरकारचे लक्ष्य असल्याचे रामविलास पासवान यांनी म्हटले आहे.

Protected Content