जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापना संदर्भात आपदा मित्र, आपदा सखी यांची कार्यशाळा संपन्न

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | उन्हाळ्यातील उष्माघात या विषयी घ्यावयाची काळजीपासून ते मान्सून मधील पूरपरिस्थिती याविषयी जिल्ह्यातील आपदा मित्र आणि आपदा सखी यांना आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत जिल्हा तालुका आणि गावस्तरावर आपत्ती व्यवस्थापनाचे सूक्ष्म नियोजन करून आराखडे तयार करून होणारी जिवितहानी व वित्तहानी कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मार्गदर्शन केले.

आज दिनांक 9 मार्च 2024 शनिवार रोजी सरदार वल्लभ भाई पटेल लेवा भवन येथे आयोजित एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण द्वारा जळगांव जिल्हयातील प्रशिक्षित आपदा मित्र,आपदा सखी यांनी येणाऱ्या उन्हाळ्यात उष्माघात विषयी घ्यावयाची काळजी ,आपत्ती येणाऱ्या भागात नदी,डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गावांच्या मान्सून काळात येणाऱ्या आपत्ती समस्या कशा टाळता येईल असा अभ्यास करून सादर विभागास कळवणे ,रेड क्रॉस चे उपाध्यक्ष श्री गनी मेमन यांनी सांगितले. रेडक्रॉसचे चेअरमन विनोद बियाणी यांनी मार्गदर्शन केले की, जेव्हा आपत्ती काळात मदत करतो तो देवदूता प्रमाणे असतो.

आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर सिंह रावळ यांनी आपदा मित्र यांनी आपल्या परिसरातील आपत्ती कमी कशी होईल याचा अभ्यास करावा तसेच आपदा मित्रांनी केलेल्या कार्य अनुभव जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतले,रेड क्रॉसचे अध्यक्ष यांनी प्रत्येक आपदा मित्रांना ऑक्सिमिटर चे वितरण केले आपत्ती समयी उपयोग होईल

अर्जुना संस्था ,वन्यजीव संरक्षण संस्था नेहमीच मदतीला असतात. सर्प जनजागृती चे राजेश सोनवणे जगदीश बैरागी यांनी सर्प विषयी माहिती व वन्यजीव संस्था सचिव योगेश गालफाडे यांनी सूत्रसंचालन केले,होमगार्ड ,एनएसएस , रेड क्रॉस ,यांचे जिल्ह्यातील सर्व आपदा मित्रांना मार्गदर्शन करून मंत्रायलाचे आपत्ती व्यवस्थापन सल्लागार ऋषि गढवाल यांनी मार्गदर्शन व आपदा मित्रांनी आपल्या कार्याची डॉक्युमेंटेशन करावे अशा सूचना दिल्या.

Protected Content