एमआयडीसीतून कामगाराची दुचाकी लांबविली

जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसीतील एमडीएस लिग्रॅण्ड कंपनीसमोरून  २० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांने चोरून नेल्याचा प्रकार गुरूवारी सायंकाळी उघडकीला आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात  चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, मनु तुकाराम बोरासे (वय-३२) रा. ममुराबाद ता.जि.जळगाव हा तरूण एमआयडीसीतील एमडीएस लिग्रॅण्ड कंपनीत कामाला आहे. नेहमीप्रमाणे गुरूवारी सकाळी ९ वाजता दुचाकी (एमएच १९ एझेड ९५९७) ने कामावर आले. कंपनीच्या समोर दुचाकी पार्किंग करून लावली. सायंकाळी कामावरून सुटी झाल्यानंतर ते घरी जाण्यासाठी निघाले असता दुचाकी जागेवर दिसून आली नाही. परिसरात शोधाशोध करून दुचाकी मिळून आली नाही. मुन बोरासे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक गणेश शिरसाळे करीत आहे. 

 

Protected Content