जळगाव, प्रतिनिधी । शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. महापौर सौ.भारती सोनवणे यांनी गणेश विसर्जन मार्गावरील कामाची पाहणी केली.
शासन निर्देशामुळे शहरातील रस्त्यांची कामे होत नसल्याने जागोजागी खड्डे पडले आहे. खड्डे बुजविण्यासाठी मनपा प्रशासनाकडून नुकतेच निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून बुधवारी कामाला प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली. गणेश विसर्जन मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सर्वप्रथम सुरू करावे अशा सूचना महापौरांनी दिल्या होत्या.
गुरुवारी सकाळी महापौर भारती सोनवणे यांनी सुभाष चौकाजवळ सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, गटनेते भगत बालाणी, शहर अभियंता डी.एस.खडके, मक्तेदार आदी उपस्थित होते.