डरने वाले बाप का, डरा हुआ बेटा हूं….! : नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर प्रहार

मुंबई । भाजपेतर मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतील उध्दव ठाकरे यांचे वक्तव्य चर्चेत असतांना आता याचाच आधार घेऊन भाजपचे नेते नितेश राणे यांनी डरने वाले बाप का, डरा हुआ बेटा हूं…अशा शब्दात आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडविली आहे.

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी काँग्रेसशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत कोरोनाविरुद्ध लढाईची चर्चा होत असताना पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे खूप कौतुक केले. बॅनर्जींनी केलेल्या कौतुकाचे आभार मानत मी लढणार्‍या बापाचा लढणारा मुलगा आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्यांचे हे वक्तव्य खूप गाजले असून याला सोशल मीडियातूनही व्यापक प्रसिध्दी मिळाली आहे. मात्र आता उद्धव ठाकरेंच्या याच विधानावर नितेश राणे यांनी प्रहार केला आहे.

भाजपाचे नेते नितेश राणे यांनी ट्विटरवर डरने वाले बाप का, डरा हुआ बेटा हूँ असं म्हणत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे. राणे कुटुंबिय सातत्याने ठाकरे घराण्याला लक्ष्य केले आहे. यात पुन्हा एकदा नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना टार्गेट केल्याचे दिसून येत आहे.

Protected Content