जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील नारीशक्ती संघटनेच्या महिलांनी काळी साडी घालून तीव्र शब्दात या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. नारीशक्ती संघटनेच्या वतीने सोमवार, २४ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने करण्यात आले. घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.
मणिपूर येथील घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येऊन संताप व्यक्त केला जात आहे. याच घटनेच्या निषेधार्थ नारीशक्ती महिला संघटनेच्या वतीने ही जळगाव शहरात अनोखे आंदोलन करण्यात आल. नारीशक्ती संघटनेच्या सर्व महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काळ्या साड्या घातल्या व काळ्या साड्या घालून जिल्हाधिकारी कार्यालयात मुख पद्धतीने निदर्शने केली व घटनेचा निषेध व्यक्त केला.
मणिपूर मधील घटना अतिशय लाजास्पद आहे. या घटनेतील दोषींना कठोर शिक्षा होऊन देशभरातील संपूर्ण महिला वर्गाला न्याय मिळवून द्यावा महिलांचा असंतोष उफाला तर त्याचे परिणाम वाईट होतील. अशी घटना पुन्हा देशात कुठेही घडू नये यामुळे दोषींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी ही नारीशक्ती संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने यावेळी करण्यात आली.