जळगाव प्रतिनिधी । शहर पेालिस ठाण्यासमोरच महिलेच्या गळ्यातून ७५ हजारांची मंगळपोत चोरी झाल्याची घटना आज संध्याकाळी घडली. विशेष म्हणजे सहाय्यक पोलिस अधीक्षक पोलिस ठाण्यात हजर असतांना बाहेरुनच पोलिस कर्मचारी या महिलेस रवाना करण्याच्या तयारीत होते. मात्र, ती बेशुद्ध पडल्याने धावपळ उडाली. सहाय्यक पोलिस अधीक्षकांनी कर्मचाऱ्यांना धारेवर धरत फुलेमार्केटचा परिसर पिंजुन काढला.
दिवाळीचा सण असल्याने मध्यवर्ती फुले मार्केट आणि सराफ बाजारात माहेरी आलेल्या महिला-गृहीणींची खरेदीसाठी गर्दी उसळते. याचा गैरफायदा घेत चोरट्यांच्या टोळ्या सक्रिय होतात. आज संध्याकाळी सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा पोलिस ठाण्यात हजर असतांना पोलिस ठाण्याच्या बाहेरुनच एका तीशीतील महिलेच्या गळ्यातील पेात चोरट्यांनी लंपास केली. घडल्या प्रकाराची आरडा ओरड होवुन मदतीसाठी या देान्ही महिला पेालिस ठाण्यात येत असतांनाच बाहेर उभ्या एका कर्मचाऱ्याने त्यांना बाहेरुनच रवाना करण्याचा प्रयत्न केला. इतक्यात दोघांपैकी एकीला चक्कर येवुन ती महिला खाली कोसळली. या घाईघरबडीत हि महिला पर्स पेालिस ठाण्यातच विसरली..निलीमा राहुल शिंदे असे या महिलेचे नाव असून गुन्हा दाखल न करताच त्या निघुन गेल्या. घडला प्रकार लक्षात येताच सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांनी चौकशी केली. पेालिस ठाण्यातील गुन्हे शोध (डी.बी.) पथकातील कर्मचाऱ्यांना बोलावले. मात्र, कोणीच जागेवर हजर नसल्याने चिंथा यांनी स्वतःच संपुर्ण फुलेमार्केट पालथे घालत.. शेाध मोहिम चालवली. वाहतुकीला रहदारीला अडथळा ठरणाऱ्यांवर यावेळी कारवाई देखील करण्यात आली.