नूतन मराठाच्या प्राचार्यसह कर्मचार्‍यांविरोधात गुन्हा दाखल करा

जळगाव प्रतिनिधी । नुतन मराठा महाविद्यालय अनधिकृत महाविद्यालय बंद व राष्ट्रगीताचा झालेल्या अवमान प्रकरणी नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य व त्या १२०-१३० कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याची टांगती तलवार असून याप्रकरणी पियुष नरेंद्र अण्णा पाटील यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात झालेल्या सुनावणीअंती मंगळवारी संबंधित प्रकरणाबाबत फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पिषुय नरेंद्रआण्णा पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार असे की, नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.पी.देशमुख यांनी विद्यापीठाचे एम.सी.मेंबर पदाचा दुरूपयोग करुन पियुष पाटील यांच्या बदनामीचा कट रचला. तसेच 7 जुलै रोजी पत्रकार परिषद घेवून बेछुट आरोप केले. तसेच 10 जुलै 2019 रोजी नूतन मराठा महाविद्यालयात प्राचार्य डॉक्टर एल पी देशमुख यांच्या सांगण्यावरून महाविद्यालयाच्या प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी महाविद्यालयात एकत्र जमून गोंधळ निर्माण केला होता व अनधिकृत महाविद्यालय बंद केले होते

तसेच आंदोलन चालू असतांना राष्ट्रगीताचा अवमान केला होता. याप्रकरणी पियुष पाटील यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यावेळी केली होती. याप्रकरणी मंगळवार, दि. 17 रोजी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला पुराव्यानिशी जबाब नोंदविला असून फिर्याद देखील दाखल केलेली आहे. तसेच संबंधित प्रकरणी महाविद्यालयातील सीसीटीव्ही फुटेज हस्तगत करण्यासह इतर कार्यवाही करुन प्राचार्य डॉ. एल पी देशमुख यांच्यासह अनधिकृत महाविद्यालय बंद केलेल्या 120/130 कर्मचार्‍यांना विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

 

Protected Content