Home Cities अमळनेर शेतातील पाईप फोडून महिलेला अश्लिल शिवीगाळ व मारहाण

शेतातील पाईप फोडून महिलेला अश्लिल शिवीगाळ व मारहाण

0
100

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील दहिवद शिवारातील शेत गट क्रमांक ९१४ मध्ये असलेल्या शेतातील पीव्हीसी पाईपांची तोडफोड करून नुकसान करून महिलेला अश्लिल शिवीगाळ करत मारहाण करून धमकी दिल्याचा प्रकार २७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता समोर आला आहे. याप्रकरणी शनिवारी ७ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी की, अनिता जगन्नाथ पाटील वय ६६ रा. दहीवद ता. अमळनेर हे वृध्द आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांनी दहीवद शिवारातील शेत गट क्रमांक ९१४ मधील शेत तारण केलेले आहे. त्यांच्या शेताच्या बाजूला शेत असलेले संभाजी नथ्थू पाटील आणि आशाबाई संभाजी पाटील दोन्ही रा.दहीवद यांनी अनिता पाटील यांच्या शेतातील ७ पीव्हीसी पाईप यांची तोडफोडून करून नुकसान केले. २७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता अनिता पाटील या महिला शेतात गेल्यानंतर त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी मुलाला फोन करून हा प्रकार सांगितला. त्याचवेळी संभाजी पाटील आणि आशाबाई पाटील हे दोघेजण अनिता पाटील यांच्याकडून येवून आम्हीच पाईपाची तोडफोड केली असे सांगून अश्लिल शिवीगाळ करत मारहाण केली. याप्रकरणी शनिवारी ७ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संदेश पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound