कारच्या समोरासमोर धडकेत महिला किरकोळ जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पहूर-जळगाव रस्त्यावरील चिंचोली गावाजवळ दोन कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात महिला किरकोळ जखमी झाल्या आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, विजय जगन्नाथ कोळी (वय-४३) रा. वाघोदा ता. रावेर हे (एमएच १९ सीजे ४१४१) ने वर्षा अशोक बागल रा. जळगाव यांच्यासह पहूरकडून जळगावकडे येत असतांना पहूर-जळगाव रस्त्यावरील चिंचोली गावाजवळ समोरून येणारी कार क्रमांक (एमएच १२ डीएस ८३०७) वरील चालकाने राँग साईडला येवून विजय कोळी यांच्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात वर्षा बागल ह्या किरकोळ जखमी झाल्या आहे. याप्रकरणी विजय कोळी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून  कार क्रमांक (एमएच १२ डीएस ८३०७) वरील चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गफुर तडवी करीत आहे.

 

Protected Content