अहमदाबाद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | चुकीचे अन्नपदार्थ डिलीव्हरी झाल्याचा प्रकार अहमदाबादमध्ये घडला आहे. एका महिलने चीज सॅडविच ऑनलाईन ऑर्डर केले असता त्या महिलेला चीज सँडविच न मिळता चिकन सँडविच मिळाले आहे. त्यामुळे त्या महिलेने संबंधित डिलीव्हरी करणाऱ्या रेस्टॉरंटला ५० लाखांची नुकसान भरपाई मागितली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण वृत्त असे की, अहमदाबादमध्ये निराली नावाच्या महिलेने पनीर टिक्का सँडविच ऑनलाईन ऑर्डर केले होते. मात्र तिला चुकून चिकन सँडविच मिळाले. त्या महिलने पनीर टिक्का सँडविच समजून चिकन सँडविच खाल्ले. ही महिला शुध्द शाकाहारी आहे. तिने संपूर्ण आयुष्यात कधीही मसांहार केला नव्हता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेने रेस्टॉरंटकडे नुकसानभरपाई म्हणून पन्नास लाख रुपयांची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकाराची अन्न विभागाने देखील दखल घेतली आहे. अन्न विभागाने रेस्टॉरंटला पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. संबंधित महिलेनं या सर्व प्रकाराची तक्रार अहमदाबाद महापालिकेच्या उप आरोग्य अधिकाऱ्याकडे केली होती. ही घटना भयंकर असल्याचे तिने यामध्ये सांगितले होते. रेस्टॉरंटला पाच हजार रुपयांचा दंड पुरेसा नाही. मला नुकसानभरपाई म्हणून पन्नास लाख रुपये मिळावे अशी मागणी निरालीने केली आहे. दरम्यान, रेस्टॉरंटने याबाबत कोणतीही प्रक्रिया दिलेली नाही.