Home क्राईम जुन्या भांडणावरून महिलेसह आईवडीलांना लोखंडी पट्टीने मारहाण

जुन्या भांडणावरून महिलेसह आईवडीलांना लोखंडी पट्टीने मारहाण

0
58


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील चौघुले प्लॉट परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून महिलेसह तिच्या आईवडीलांना अश्लिल शिवीगाळ करत लोखंडी पट्टीने वार करून जखमी केल्याची घटना बुधवारी १५ जानेवारी रोजी रात्री १० वाजात घडली आहे. याप्रकरणी गुरूवारी १६ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती, चौघुले प्लॉट परिसरात सुचिता दिपक पाटील वय २० या महिला आपल्या आईवडीलांसह वास्तव्याला आहेत. बुधवारी १५ जानेवारी रोजी रात्री १० वाजता जुन्या भांडणाच्या कारणावरून परिसरात राहणारा खुशाल पिंताबर सोनार याने महिलेचे वडील दिपक शिवनारायण पाटील यांना हातावर लोखंडी पट्टी मारली, तसेच महिलेची आई पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असतांना त्यांनाही शिवीगाळ करत पट्टी डोक्यात मारली, ही घटना घडल्यानंतर भांडण सोडविण्यासाठी महिला गेली असता त्यांना देखील अश्लिल शिवीगाळ केली. दरम्यान याप्रकरणी महिलेने शनीपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी खुशालन पितांबर सोनार रा. जळगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ युवराज कोळी हे करीत आहे.


Protected Content

Play sound