22 डिसेंबरपासून सुरु होणार हिवाळी अधिवेशन….

मुंबई प्रतिनिधी | संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी 22 डिसेंबरपासून अर्थसंकल्पीय हिवाळी अधिवेशन सुरु होणार असल्याचे जाहीर केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही लस घेतल्या असतील त्यांनाच प्रवेश मिळणार असून अधिवेशनात हजेरी लावण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीसुद्धा करणे आवश्यक असल्याचे परब यांनी सांगितलं. यामुळे अधिवेशनात किती सदस्य उपस्थित असतील हेही सांगता येणार नाही.

मुख्यमंत्री स्वतः अधिवेशनात उपस्थित राहणार असल्याने आणि त्यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे यंदा हिवाळी अधिवेशन नागपूरात नाही तर मुंबईतच होणार आहे. 22 ते 24 तर दुसऱ्या आठवड्यात 27 आणि 28 डिसेंबर असा कार्यक्रम नक्की झाला असून त्यानंतर 24 डिसेंबरला अधिवेशनाचा कालावधी ठरवण्यात येईल. या अधिवेशनात 12 बिले व 11 विधेयके मांडली जाणार असून प्रश्नोत्तराचं सदर हिवाळी अधिवेशनात संपन्न होणार. अशी माहिती अनिल परब यांनी दिलीय. यंदाचं हिवाळी अधिवेशन होईल अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे.

Protected Content