नागपुरातच होणार हिवाळी अधिवेशन

मुंबई प्रतिनिधी | विधीमंडळाचे यंदाचे हिवाळी अधिवेशन डिसेंबर महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यात नागपूर येथे सुरू होणार असल्याचा निर्णय आज कामकाज समितीच्या बैठकीत घेण्यात आल्या.

 

विधान परिषदेच्या निवडणुका येत्या १० डिसेंबरला पार पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन एक आठवडा पुढे ढकलण्याची मागणी केली जात होती. त्यामुळे हिवाळी अधिवेशन नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यात जाण्याची शक्यता होती. मात्र आता डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ठेवण्यात आले आहे. आज कामकाज समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यंदाचे अधिवेशन मागील वर्षाप्रमाणे मुंबई घेण्याची मागणी केली जात होती. मात्र विरोधकांनी आक्षेप घेतल्यानंतर कामकाज समितीने यंदाचे अधिवेशन हे नागपुरात होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अधिेवेशाचा कालावधी किती दिवसाचा असणार याबाबत स्पष्ट करण्यात आलेले नाही.

 

कोरोनाच्या आपत्तीमुळे मागील वर्षी झालेले हिवाळी अधिवेशन दोनच दिवसात उरकण्यात आले होते. कोरोनाचा धोका असल्याने कामकाज समितीने हिवाळी अधिवेशन दोनच दिवसात आटोपण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे विरोध आक्रमक झाले होते. तसेच महाविकास आघाडी सरकार प्रश्नांचे उत्तर देण्यास घाबरत असल्याची टीका देखील करण्यात आली होती. मात्र यंदा अधिवेशनाचा कालावधी जास्त असण्याची शक्यता आहे.

 

अधिवेशन नागपुरामध्ये घेण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. पुढच्या वर्षी राज्यातील अनेक शहारांच्या महानगर पालिकांच्या निवडणुका देखील होणार आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचार्‍यांच्या मुद्दा देखील गाजत आहे. तसेच राज्यातील गांजा, ड्रग्स या मुद्द्यावरून देखील विरोधक सत्ताधार्‍यांना धारेवर धरण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

Protected Content