छिंदवाडा म.प्र. (वृत्तसंस्था) येथे एका २५ वर्षीय तरुणाने पबजी खेळण्याच्या नादात पाणी समजून अॅसिड प्यायल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर या तरुणाला प्रचंड धक्का बसला. तरीही त्याने पबजी खेळणे मात्र सोडले नाही. हा तरुण २५ वर्षांचा असून विवाहित आहे. ही घटना एका महिन्यापूर्वीची आहे.
तो पबजी खेळत असताना बाजुला दोन बाटल्या होत्या. एक पाण्याची होती तर दुसरी अॅसिडची. गेम खेळण्याच्या नादात या तरुणाने अॅसिडची बॉटल तोंडाला लावून ते पाणी समजून प्याले. या तरुणावर आधी मध्य प्रदेश व नंतर नागपूर येथे उपचार करण्यात आले. अॅसिड प्यायल्यामुळे या तरुणाच्या पोटात प्रचंड वेदना सुरु झाल्या होत्या. अॅसिड प्यायल्यानंतर या तरुणावर दोन वेळेस उपाचार करण्यात आले. १९ फेब्रुवारी रोजी त्याच्यावर पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात आली. या तरुणाला पबजी खेळण्याचे इतके वेड लागले होते की, तो उपचार सुरू असताना सुद्धा पबजी खेळत होता. पोटात वेदना होत असतानाही या तरुणाने पबजी खेळणे सोडले नाही. दरम्यान, गुजरात सरकारने या गेमवर बंदी घातली आहे. परीक्षाच्या काळात या गेमवर बंदी आणावी, अशी मागणी विद्यार्थी संघटनेने केली आहे.